*वंदे महाराष्ट्र... वंदे शिवराय...*
संयुक्त महाराष्ट्रचे गीत ... !
जनतेच्या सत्तेची ज्योत जागती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... || धृ ||
फिरंग्यास गोव्याच्या चारूनी खडे ... माय मराठी बोली चालली पुढे ... |
एकभाषिकांची हो येथ संगती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... || १ ||
सह्य पठारीच्या तेजस्वी रणकथा ... रंगती शाहीर मुखे अजुनी एकता ... |
इतिहासी एक मिळे स्फूर्ति अन् गती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... || २ ||
कोकणच्या दुःखाची तरल स्पंदने ... नागपूरी जनतेची हलविती मने ... |
माय एक धरणीला जेथ मानती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... || ३ ||
शेतकरी जमिनीचा एथल्या धनी ... कामगार जनतेचा येथ अग्रणी ... |
श्रमजीवी सत्तेची जेथ शाश्वती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... || ४ ||
भिन्न धर्म जातीची सर्व बंधने ... तोडुनिया एकजीव जाहली मने ... |
लोकयुगासाठी जिथे रक्त सांडती ... गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती ... || ५ ||
कवि – कै. डॉ. सुधीर फडके ...
मूळ गायक – शाहिर अमर शेख ...
Thanks to some e-mail forward...
No comments:
Post a Comment